Subscribe Us

बुलडाणा जिल्ह्याचे शिक्षण  क्षेत्रातील दोन बदल

बुलडाणा जिल्ह्याचे शिक्षण  क्षेत्रातील दोन बदल

 बुलडाणा जिल्हयाला शैक्षणिक क्षेत्रात राज्यात नावलौकिक मिळवून देणाऱ्या शिक्षणाधिकारी वैशालीताई ठग , डायट प्राचार्य डाँ. सुभाष कांबळे  साहेब या प्राथमिक शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्याच्या नुकत्याच बदल्या झाल्या . त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात संपन्न झालेल्या शैक्षणिक कार्यावर टाकलेला दृष्टीक्षेप

शिक्षणाधिकारी वैशालीताई ठगयांनी सरळसेवेद्वारे परीक्षा देऊन शिक्षक ते शिक्षणाधिकारी असा प्रवास करत जिल्ह्यातच शिक्षणाधिकारी पदाची सूत्र हाती घेतली . त्यांच्या कार्यकाळात  सर्वात महत्वाचे कार्य पूर्ण झाले ते प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावली रोष्टर चे  गेल्या अनेक वर्षापासून सदर काम पूर्ण नसल्यामुळे पदोन्नती , आंतरजिल्हा बदली होऊ शकत नव्हत्या रोष्टर  पूर्ण झाल्यामुळे मुख्याध्यापक पदोन्नती, आंतर जिल्हाबदली प्रकरणे पूर्ण झाली . अमरावती विभागात रोस्टर पूर्ण करणारा एकमेव जिल्हा .

शिक्षण विभागाच्या  गेल्या तीन वर्षात शासनाने विविध  महत्त्वपूर्ण बदल केले त्यात शालार्थ वेतन प्रणाली ,  सरल , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे विविध उपक्रम यात जिल्ह्यास शिक्षक ,पर्यवेक्षीय यंत्रणा ,कार्यालयीन कर्मचारी यांच्या मदतीने जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात अग्रस्थानी ठेवले .

दुसरे अधिकारी म्हणजे डायट चे प्राचार्य सुभाष कांबळे साहेब , यांनी एक वेगळी छाप कुशल प्रशासक , नेतृत्व गुण , प्रभावी वक्ता , कोणत्याही  कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन  यातून जिल्ह्याला व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस वेगळी  ओळख दिली . प्राचार्य पदाची  सूत्र हाती घेतल्यानंतर नवोपक्रमशील शिक्षक यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या कार्यशाळा , शिक्षकामधील लेखन कौशल ध्यानात घेऊन आमची शाळा आमचे गुरुजी , व्यक्तिपरिचय  यासारख्या विविध पुस्तकांचे प्रकाशन केले . उर्दू शिक्षकांसाठी विविध पुस्तक निर्मिती करत राज्यात उर्दूचे साहित्य निर्माण करणारा पहिला जिल्हा

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र निमित्ताने मा. मुख्यकार्यकारी अधिकारी दीपाताई मुधोळ यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखालीडायट मध्ये दरमहा घेण्यात आलेल्या आढावा सभेमुळे ज्ञानरचनावादाची कास धरत जिल्ह्यातील विध्यार्थी प्रगत होण्यास मदत झाली . राज्यात जिल्हा अग्रस्थानी राहिला .

या दोन्ही अधिकाऱ्याच्या कार्यकाळात शालेय शिक्षण सचिव नंदकुमार साहेब  , शिक्षण आयुक्त  भापकर यांच्या शिक्षण परिषदा  यशस्वी  रितीने संपन झाल्या .                              

तंत्रस्नेही शिक्षकांना उत्तेजन देत शिक्षकाच्या    कार्यशाळा घेतल्या . मोबाईल मिशन डिजिटल स्कूल अंतर्गत सर्व शाळा मोबाईल डिजिटल करण्यात आल्या आहेत .
जिल्हा सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा  शाखा बुलडाणा     

शिक्षणाधिकारी वैशालीताई ठग , डायट प्राचार्य डाँ. सुभाष कांबळे  साहेब या दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करत आपल्या कार्याने आपली ओळख निर्माण केली त्यांना त्यांच्या नवीन ठिकाणी अश्याच कार्यासाठी शुभेच्छा

त्याच प्रमाणे जिल्ह्यात नवीन येत असलेले शिक्षणाधिकारी एन के देशमुख साहेब  व डायट चे नवनियुक्त प्राचार्य  श्री समाधान डुकरे साहेब  यांच्याकडून सुध्दा अश्याच कार्याची अपेक्षा ठेवत त्यांचे हार्दिक स्वागत शुभेच्छा

शब्दांकन

     रविंद्र नादरकर

 तंत्रस्नेही  शिक्षक

Post a Comment

0 Comments